Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशेण खताला आला सोन्याचा भाव! एका ट्रॉलीसाठी मोजावे लागताहेत तब्बल ५ हजार...

शेण खताला आला सोन्याचा भाव! एका ट्रॉलीसाठी मोजावे लागताहेत तब्बल ५ हजार रुपये

कवडदरा | वार्ताहर

एकीकडे लग्नसराई सुरू असून उन्हाचा कडाका वाढला आहे, तर दुसरीकडे शेतकरी खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतातील आंतर मशागतीच्या कामात व्यस्त दिसत आहे. सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात शेणखत टाकण्याचे काम सुरू आहे….

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द,पिंपळगाव डुकरा, शेणित, बेलू परिसरात ऊस पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. त्यासाठी शेतकरी शेणखत मोठ्या शेतजमिनीचा पोत वाढण्यासाठी शेणखतासाखरे खत नाही. त्यामुळे शेतीतील उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी शेणखताला महत्त्व देतात. मात्र पशुधनांची संख्या घटल्यामुळे शेणखत मिळणे अवघड झाले आहे.

शेणखताला सोन्याचा भावा आला असून एक टॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी ५ हजार ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. यंदा शेणखताचा दर खूपच वाढला आहे. अलीकडे शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाल्याने ही समस्या निर्माण होत आहे. पैसे देऊनही चांगले शेणखत मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

Nashik Crime : जेलरोडला धारदार शस्त्राने एकाचा खून

त्यामुळे चांगल्या शेणखताला सोन्याचे दिवस आले म्हणायला हरकत नाही. रासायनिक खताचा वारेमाप वापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे जमिनीचा कस टिकवण्यासाठी शेणखत उपयुक्त ठरते. पेरणी वेळी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याचे धडपड शेतामध्ये शेणखत टाकण्याची असते.

अनेक शेतकरी शेतामध्ये शेणखत मिळत नसल्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करतात. त्यामध्ये कोंबडीखत, लेंडीखत तसेच साखर कारखान्यातील मळी टाकण्यात येते. मळीमुळे उत्पन्नात वाढ होत असली तरी नंतर शेतजमिन खराब होते. त्यामुळे शेणखताला सर्वाधिक शेतकऱ्यांची पसंती आहे. शेणखत टाकल्याने जमिनीचा पोत चांगला सुधारतो. पीक जोमाने येते, उत्पादनात वाढ होते.

Nashik Crime : सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी, ग्रीलमधून हात घालत पादुका लंपास

त्यामुळे बहुतांश शेतकरी मिळेल त्या भावाने शेणखत टाकत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याकडे सध्या जनावरांची संख्या अल्प प्रमाणात आहे. परंतु अनेक मजुरांकडे जनावरांची संख्या असून ते दुधाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात. शेतकऱ्यांच्या शेतामध्येच जनावर नेतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना शेणखताची विक्री करून चांगला पैसा कमावला जातो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शिवशाही बसमधील ‘त्या’ आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल

पूर्वी एखादे जनावर असले तरीही त्याचे शेण वर्षभर उकंड्यामध्ये जमा करून ठेवण्यात येत होते आणि उन्हाळ्यात ते शेतात टाकले जात होते. आता स्वतंत्र शेणखतच एकत्रीत ठेवले जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरची ट्रॉली भरुन शेतात नेऊन टाकले जात आहे. पाच ते सहा हजार रुपये एका शेणखताच्या ट्रॉली साठी घेतले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या