Thursday, April 25, 2024
Homeनगरकिरकोळ कारणावरून खुनी हल्ला

किरकोळ कारणावरून खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहनाचा कट मारल्याच्या कारणातून नऊ जणांच्या टोळक्याने मासे विक्रेत्याला लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या मारहाणीत मासे विक्रेते जितेंद्र भोसले (वय 30 रा. कामरगाव ता. नगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शशीकांत सिताराम भोसले, रमेश सिताराम भोसले, दिनेश (पूर्ण नाव माहिती नाही), वत्र्याप भोसले, गोरख चव्हाण, सागर भोसले, सोनाली भोसले, कुरूना भोसले, पानतास भोसले (सर्व रा. कामरगाव ता. नगर) यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र भोसले त्यांच्या घरी असताना पानतास भोसले तेथे आला. तो जितेंद्र यांना घराच्या पाठीमागे घेऊन गेला व म्हणाला, तू माझा मुलगा सागर याला वाहनाचा कट का मारला. याच कारणातून पानतास याने जितेंद्र यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला केला.

इतर आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी जितेंद्र यांना लाकडी दांडके, लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जितेंद्र भोसले जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या