Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतिहेरी तलाक प्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल

तिहेरी तलाक प्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी

मुस्लिम महिलांचे विवाह हक्क संरक्षण कायदा 2019 अन्वये सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून पती सासू-सासऱ्यासह पाच जणांविरोधात तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफसाना एजाज मोमीन (30) रा. सारोळे पठार, तालुका संगमनेर हल्ली राहणार नांदूर शिंगोटे हीच्या फिर्यादीवरून एजाज युसुफ मोमीन, युसुफ हुसेन मोमीन, सायरा युसुफ मोमीन सर्व  रा. सारोळे पठार ता. संगमनेर व नसीम ताहेर मुजावर, ताहेर रफिक मुजावर रा. घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे यांच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तिहेरी तलाक प्रकरणी दाखल झालेला हा नाशिक जिल्ह्यातील तिसरा गुन्हा ठरला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार पती, सासू – सासरे, नणंद, नंदई यांनी संगनमताने पिकअप जीप घेण्यासाठी  माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी मे 2009 पासून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच किरकोळ कारणावरून नेहमीच वाईट शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. तर पती एजाज मोमीन याने तिला सांभाळ न करण्याच्या उद्देशाने तीन वेळा तलाक असे म्हणून बेकायदेशीर रित्या तलाक दिला व याबाबत कुठे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपाधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस हवालदार पी.के. अडांगळे तपास करीत आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या