Saturday, April 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : मॉल उघडले मग मंदिरे का नाही?

त्र्यंबकेश्वर : मॉल उघडले मग मंदिरे का नाही?

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर नगरीतील पुरोहित संघाचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या ठिकाणी भेट घेतली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी आवश्यक ती काळजी घेवून खुले करण्यात यावे, यासंदर्भात निवेदन देऊन यासाठी राज्य सरकारकडे भूमिका मांडण्यासाठी साकडे घातले आहे.

- Advertisement -

दरम्यान गेल्या चार महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असून यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येत नाही. तसेच मंदिरामुळे चालणारे इतर व्यवसाय बंद असल्याने येथील व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे पुरोहित शिष्टमंडळाने सांगितले.

राज्यातील मॉल उघडले मग मंदिरे का नाही ? असा सवाल उपस्थित करत मंदिर प्रशासनातर्फे राज्य व केंद्र सरकारच्या सर्व निर्देषांचे पालन करून योग्य ती उपाययोजना केल्यास भाविकांसाठी राज्यातील मंदिरांचे कवाड उघडायला हरकत नसावी, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

या वेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांच्यासह अन्य पुरोहित तसेच मनसेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या