Friday, May 10, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर तालुक्यातील रुग्ण संख्या २३ वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रुग्ण संख्या २३ वर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २३ झाली असून एकट्या हरसूल मधील रुग्णसंख्या १८ झाली आहे.

दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून यामुळे तालुका आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. सुरवातीला हरसूल येथे पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्र्यंबक शहरात करोनाचा शिरकाव झाला. त्यापाठोपाठ हरसुलमध्ये आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.योगेश मोरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

सध्या तालुक्यात ब्रम्हा व्हॅली येथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. सर्व क्वारंटाइन असलेल्या सर्व रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यातील हरसूल १८ त्र्यंबकेश्वर ४ तर वावी हर्ष

१ अशी २३ रुग्णसंख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर उद्यापासून ते १० जुलै पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या