Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : महाशिवरात्रीला प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ! या ठिकाणी घ्या दर्शन

Video : महाशिवरात्रीला प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ! या ठिकाणी घ्या दर्शन

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्र पर्व काळासाठी सजले आहे. तथापि या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार आहे. यापूर्वीच ट्रस्टने तशी सूचना जाहीर केली होती.

- Advertisement -

दरवर्षी महाशिवरात्रीला मध्यरात्री होणारी महापूजा मंदिर अंतर्गत होईल तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेत त्रंबकेश्वरचा पालखी सोहळा होईल पालखी नगरीतील नियोजित मार्गाने निघेल. नागरिक भाविक यांना पालखीदर्शन होईल. मंदिर सजले पण भाविक राहणार नाही, अशी स्थिती महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिरात असणार आहे

प्रथमच या वर्षी या उत्सवा बाबत असे घडत आहे. ट्रस्टला अगोदर तयारी करावी लागते. त्याप्रमाणे ट्रस्ट मंडळाने महाशिवरात्र उत्सवाची तयारी केली होती, पण कोवीड संकटामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

त्रंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून मंदिर दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीमार्फत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या