Saturday, April 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार

त्र्यंबकेश्वर | Trimabakeshwer

त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्र्यंबक शहरात लवकरच ऑक्सीजन प्लॅन्ट सुरू करणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुका करोना आढावा बैठकीत याबाबत मंदिर ट्रस्टने सांगितले. दरम्यान तालुक्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून बऱ्या होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण वाढते आहे.

प्रांत. अधिकारी तेजस चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये सद्यस्थितीला अनुसरून व भविष्यातही गरज म्हणून त्र्यंबक शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्ट ऑक्सिजन प्लँट बाबत विचाराधीन आहे. लवरकच याबाबत निर्णय घेऊन कळवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसरे, तहसीलदार दीपक गिरासे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मंदाकिनी बर्वे, डॉ. भागवत लोंढे इत्यादी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या