Friday, April 26, 2024
Homeनाशिकसावधान! त्र्यंबक नाका ते मायको सर्कलमार्गे प्रवास करताय? वाहतुकीत पुढील १०५ दिवस...

सावधान! त्र्यंबक नाका ते मायको सर्कलमार्गे प्रवास करताय? वाहतुकीत पुढील १०५ दिवस बदल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटीच्या (Smart City) अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागात कामे सुरु आहेत. शहरातील मुख्य रस्त्या समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकनाका सिग्नल (Trimbaknaka Signal to Mico Circle) ते मायको सर्कल परिसरात आता स्मार्ट सिटी (Smart City nashik) अंतर्गत विकास होत आहे. यासाठी पुढील १०५ दिवस वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिली आहे….

- Advertisement -

स्मार्टसिटीच्या नियोजनानुसार, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे (Water Pipeline) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. एकूण पाच टप्प्यात हे काम होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक डाव्या बाजूला (left side) दुहेरी सुरु राहणार असून उजव्या बाजूच्या रस्ता खोदण्यात येणार आहे. यामुळे नियमित वर्दळीच्या असलेल्या या भागात आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

पहिल्या टप्प्यात त्र्यंबकनाका सिग्नल ते हॉटेल राजदूतदरम्यानचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरा टप्पा राजदूत होते ते सिव्हील हॉस्पिटल दरम्यान होणार असून या कामासाठी तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तिसरा टप्पा सिव्हील हॉस्पिटल ते तरण तलाव असणार आहे हे काम तब्बल महिनाभर म्हणजेच ३० दिवस चालणार आहे.

यानंतर चौथा टप्पा हाती घेण्यात येणार असून तरणतलाव ते वेद मंदिर दरम्यान हा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. यानंतर अखेरचा टप्पा वेद मंदिर ते मायको सर्कल दरम्यान होणार असून या टप्प्याला जवळपास २० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीलाही काही निर्बंध घालून देण्यात आले असून यामध्ये वाहनांना दिसतील असे एकेरी मार्ग, प्रवेश बंद, नो पार्किंग चे रेडियम बोर्ड लावावे लागणार आहेत. तसेच वाहतूक शाखेशी सलंग्न राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हे वाहतूक नियोजन अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना देखील लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग आणि नियम

  • त्र्यंबक नाका ते मायको सर्कलकडे जाण्यासाठी डाव्या बाजूने जाता येईल.

  • रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन असेल.

  • त्रिमूर्ती चौक व सातपूर, त्र्यंबककडे जाणाऱ्या वाहनांना गडकरी चौक-चांडक सर्कल मार्गे पुढे जाता येईल.

  • वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सकाळी ८ ते रात्री ७ वाजेपर्यंत एकूण १० वार्डन ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या