Photogallery : त्र्यंबक परिसर बहरला !

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

पावसाळा (Rainy Season) म्हटलं निसर्ग सहलींना (Nature Tour) उधाण येते. अशातच, जिल्ह्यातील त्र्यंबक (Trimbak), पहिने (Pahine) तर डोळ्यात साठवणारा निसर्ग घेऊन येत असतो. यंदाही हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटला असून छोटे छोटे ओढे, धबधबे, पान फुल बहरली आहेत.

दरम्यान गेल्या दोन तीन दिवसापासून त्र्यंबक परिसरात मुसळधार पाऊस होत असून यामुळे ब्रम्हगिरी पर्वत (Bramhgiri), अंजनेरी (Anjneri), पहिने परिसरातील फेसाळते धबधबे (Waterfalls) पर्यटकांना खुणावू लागले आहेत. ब्रम्हगिरी वरून पडणारे पाणी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

त्र्यंबक शहराच्या (Trimbak City) लगत असलेला निलपर्वतावरून (Nilparwat) त्र्यंबक शहराचे विलोभनीय दृश्य दिसत असून आजूबाजूची भात शेती त्याहून आकर्षक भासत आहे.

सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis) जिल्ह्यात पर्यटन बंदी आहे. त्यामुळे येथील परिसरही हे सर्व खुले होण्याची वाट पाहत असल्याचे भासते आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *