Thursday, April 25, 2024
Homeनगर‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे - ना. काळे

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे – ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत संपूर्ण देशभर हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोपरगाव नगर परिषदेच्यावतीने आशा सेविकांच्या सहाय्याने शासकीय दराने सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी कोपरगाव शहरात राष्ट्रध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन ना. आशुतोष काळे यांच्याहस्ते करण्यात आले.

ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करून बलिदान देणार्‍या शूर हुतात्म्यांचे बलिदान कुणीही विसरू शकत नाही. या अभिनव अशा मोहिमेत सहभागी होऊन देशाप्रती व हुतात्म्यांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत भाग घेऊन नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावावा. ध्वजाबाबत असलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ध्वजाचा सन्मान देखील राखावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. आशुतोष काळे यांनी स्वत: देखील या विक्री केंद्रातून राष्ट्रध्वज खरेदी केला.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, धनंजय कहार, बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तार, भाऊसाहेब भाबड, जाफर कुरेशी, जुनेद शेख, बाळासाहेब पवार, आकाश सोळसे, विजय शिंदे, विशाल गुंजाळ, रोहित सोनवणे, सुनील बोरा, रामा जाधव, नितीन शिंदे, विशाल गुंजाळ, ज्ञानेश्वर चाकणे, डॉ. गायत्री कांडेकर, प्रशांत उपाध्ये, राजेंद्र इंगळे, अरुण थोरात, प्रेमकुमार गायकवाड, राजेंद्र शेलार, रवी वाल्हेकर, कैलास आझाद, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या