Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआदिवासी संघटनेचे मुख्यमंत्री शिंदेंना साकडे

आदिवासी संघटनेचे मुख्यमंत्री शिंदेंना साकडे

साल्हेर । वार्ताहर | Salher

नाशिक जिल्ह्यात (nashik district) नुकतीच जिल्हा परिषद (Zilha Parishad) गट व पंचायत समिती (panchayat samiti) गणांच्या निवडणुकीची (election) आरक्षण सोडत (Leaving the reservation) जाहीर झाली आहे.

- Advertisement -

त्यात कळवण (kalwan) व बागलाण तालुक्यात (baglan taluka) आदिवासी समाजाची (tribal community) लोकसंख्या जास्त प्रमाणात असल्याने या दोन्ही तालुक्यातील आरक्षणाबाबत फेरविचार करून आदिवासी समाजास योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे मालेगाव (malegaon) दौर्‍यावर आले असता त्यांना आदिवासी संघटना व जनतेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील (nashik district) पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट आरक्षणात अन्याय झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

तसेच कळवण तालुका (kalwan taluka) मालेगाव जिल्हात वर्ग करण्यात येऊ नये व अतिवृष्टीमुळे (heavy rain) कळवण (kalwan), बागलाण तालुक्यात खरीप पिकांचे (kharif crop) मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, असे निवेदन (memorandum) आदिवासी बचाव संघटनेतर्फे देण्यात आले.

यावेळी आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, सरपंच ज्ञानदेव पवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष बेबीलाल पालवी, आदिवासी बचाव अभियान संपर्कप्रमुख जयराम गावीत आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या