Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदिवाळीनिमित्त बोरीचीबारी येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव संपन्न

दिवाळीनिमित्त बोरीचीबारी येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव संपन्न

खोकरविहीर | प्रतिनिधी |Khokarvehir

दिवाळीनिमित्त (Diwali) बोरीचीबारी (Borichibari) येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव (Tribal Cultural Festival) संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे विदिशा मध्यप्रदेश येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश भरसट (आय. ए. एस. ) नाशिकचे वरीष्ठ प्रबंधक घनश्याम महाले, मुख्य वित्त व लेखाधिकारी जनार्धन खोटरे तसेच यशोदीप संस्थेचे अध्यक्ष गिरीश गावित,जलपरिषदेचे देविदास कामडी, श्यामला चव्हाण हे उपस्थित होते…

- Advertisement -

या कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा (Birsa Munda)यांच्या प्रतिमेने तसेच आदिवासीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या कनसरा नागली धान्याच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा कुंभाळे ग्रामपंचायतीचे (Kumbhale Gram Panchayat) नवनियुक्त सरपंच मोहन कामडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच आंबे गावातील होडी नृत्य सादर करण्यात आले. तर झरी येथील ढोलावरील ठाकरी नृत्य, टारपी नृत्य या पारंपरिक नृत्य प्रकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय आंधरुटे गावातील युवा कलाकारांनी आदिवासी जीवनावर आधारित नवीन गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी लहान मुलांनी विविध नृत्य सादर केली. तसेच प्रेक्षकांनी लहान मुलांना व कलाकारांना उत्स्फूर्तपणे बक्षिसे देऊन दाद दिली. तर देवदत्त चौधरी, मधुचंद्र भुसारे, पंकज गवळी, गौरव कोहंकिरे या कवींनी त्यांच्या आदिवासी जीवनावरील कवितांचे (Poems) सादरीकरण केले.

याशिवाय सदर कार्यक्रमात आदिवासी जीवनावरील पारंपारिककला तसेच नाविन्यपूर्ण निर्मितीचा संयोग दिसून आला. या कार्यक्रमाचे नियोजन यशोदीप बहुउद्देशीय सर्वांगीण विकास सेवा संस्था, पेठ यांच्या संकल्पनेतून बोरीचीबारी ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

कार्यक्रमात पेठ तालुक्यातील ( Peth taluka) बोरीचीबारी, कुंभाळे, खडकी, मोहचापाडा,गोळसपाडा, डेरापाडा, कायरे सादडपाडा, सावरणा इत्यादी गावांतील लोकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली.

दरम्यान,कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरीचीबारी गावातील ग्रामस्थ,महिला व तरुण मित्र मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोये व गिरीश मानभाव यांनी तर प्रास्ताविक तुकाराम भवर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या