Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारपाच हजाराची लाच स्वीकारताना आदिवासी महामंडळाच्या कनिष्ठ सहाय्यक व चौकीदारास अटक

पाच हजाराची लाच स्वीकारताना आदिवासी महामंडळाच्या कनिष्ठ सहाय्यक व चौकीदारास अटक

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी

तालुक्यातील करणखेडा येथील गोदामात ठेवण्यात आलेली ज्वारी विक्री (Sorghum sales) करण्यासाठी 5 हजाराची लाच (Bribe) स्वीकारताना नंदुरबार येथील आदिवासी विकास महामंडळाचे (Tribal Corporation) कनिष्ठ सहाय्यक (Junior assistant ) व चौकीदारास ( watchman) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने रंगेहाथ अटक (arrested) केली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मूळ तक्रारदाराची करणखेडा (ता.नंदुरबार) शिवारात गट नंबर 27 व 112 मध्ये 30 एकर शेत जमीन आहे. सदर शेती तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर आहे. सन 2021 मध्ये दिवाळीच्या सुमारास निघालेली अंदाजे दोनशे क्विंटल ज्वारी करण्खेडा येथील गोडाऊनमध्ये ठेवलेली होती.

सदर ज्वारी खराब असल्याचे सांगून तु ही ज्वारी विकू शकत नाही, असे नंदुरबार येथील आदिवासी विकास महामंडळाचे कनिष्ठ सहाय्यक अजय कीका पाडवी व चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांनी सांगून तुला जर ही ज्वारी विकायची असेल तर प्रति क्विंटल दोनशे रुपये द्यावे लागतील. तडजोडीअंती प्रति क्विंटल 50 रुपये लाचेची मागणी केली.

त्यानुसार पाडवी व गिरासे यांनी तक्रारदार कडे पाच हजार रुपये लाचेची रक्कम आज दिनांक 7 जानेवारी रोजी टोकरतलाव येथील धान्य गोदामाजवळ स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, विजय ठाकरे, विलास पाटील, अमोल मराठे, पोलीस नाईक चित्ते चालक महाले यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या