Sunday, May 5, 2024
HomeनाशिकNashik News : "धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण..."; त्र्यंबकेश्वर,...

Nashik News : “धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण…”; त्र्यंबकेश्वर, घोटीत आदिवासी समाजाचे आंदोलन

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावात (Antarwali Sarati Village) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह राज्यभरात विविध मराठा संघटनांनी आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून (OBC) आरक्षण द्यावे यासह विविध मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या…

- Advertisement -

WhatsApp News : आता २४ तास नाही तर दोन आठवड्यांपर्यंत ठेवता येणार व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस; कशी असेल प्रक्रिया?

मराठा समाजाच्या या आंदोलनानंतर धनगर समाजानेही (Dhangar Community) आंदोलनाचे (Agitation) हत्यार उपसत आदिवासींच्या प्रवर्गातून (ST Reservation) आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र आदिवासींमधून आरक्षण देऊ नये, अशी मागणी आदिवासी समाजाने केली होती. याबरोबरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील आदिवासी संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधवांनी (Tribal Society) एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे आरक्षणप्रश्नी आदिवासी समाज देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी; २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

यावेळी आदिवासी विकास परिषदेच्या (Tribal Development Council) कार्यकर्त्यांनी म्हटले की, आदिवासींच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. सरकारकडून आदिवासी जमातीत धनगर जातीचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर (Road) उतरलो आहोत. तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर व आदिवासी जमातीचा (Tribal) सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला आहे. तो शासनाने जाहीर करावा, पेसा कायद्याची छेडछाड करू नये, उलट पेसा कायदा कडक करावा, कंत्राटी भरती रद्द करावी, सटाणा येथील आंदोलनातील आदिवासींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरुच; नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwer) दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) विराट मोर्चा (Morcha) काढण्यात आला होता. त्यानंतर आज आदिवासी संघटना, आदिवासी विकास परिषद यांच्यासह आदी आदिवासी संघटनांनी रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केले. यावेळी आदिवासी बांधवांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Accident News : पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या