Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याट्रायल रनची डोकेदुखी कायम

ट्रायल रनची डोकेदुखी कायम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (heart of the city) असलेल्या रविवार कारंजा (ravivar karanja) आणि निमानी चौक (Nimani Chowk) येथे वाहतूक (Transportation) सुरळीत आणि शिस्तीत रहावी यासाठी वाहतूक बेट वाढविण्याचे तसेच दुभाजक (Divider) करण्यासाठी ट्रायल (Trial) घेतली जात आहे.

- Advertisement -

अचानक सुरू केलेल्या या ट्रायल रनमुळे (Trial run) नागरिक, व्यवसायिक यांना वाहतूक चक्काजाम समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत व्यवसायिकांनी तसेच देशदूतच्या फेसबुक पेजवर (Facebook page) नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत या जंक्शनच्या आधी प्रस्तावित पार्किंग (Parking) पूर्ण करा, असे म्हटले आहे. दरम्यान, शहरात निमाणी जवळील वाहतूक बेट,

रविवार कारंजा जवळील वाहतूक बेट आणि शालिमार (shalimar) चौकातील वाहतूक बेट अशी तीन बेटे जंक्शन विकास कार्यक्रमात घेण्याचा विचार आहे. सध्या रविवार कारंजा आणि निमाणी चौक येथे प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यात येत असून 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत ही चाचणी होणार आहे. या चाचणीमधून वाहतूक सुधारण्यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया, आक्षेप, सल्ले आणि स्मार्ट सिटीच्या (Smart City) तज्ज्ञांचे निरीक्षण यावर भविष्यात कसे करायचे याबाबत नियोजन करण्यात येणार होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या