Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवृक्ष मोफत प्राणवायू देणारे सजीव स्त्रोत: मोरे

वृक्ष मोफत प्राणवायू देणारे सजीव स्त्रोत: मोरे

नैताळे। वार्ताहर | Naitale

येथील ग्रामपंचायत मालकीच्या 20 एकर क्षेत्रात जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सिजन पार्क (Oxygen Park) ची मुहूर्तमेढ आज उभी राहत असून

- Advertisement -

अशा प्रकारे संपूर्ण भारतभर एक कोटी वृक्ष लागवड (tree plantation) व संवर्धन करून मोफत मिळणार्‍या ऑक्सिजनचे कारखाने (oxygen factories) उभे करण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वरचे (Shri Swami Samarth Gurukul Peeth Trimbakeshwar) युवा प्रबोधक व बाल संस्कार विभागाचे प्रमुख नितीन मोरे (Nitin More, youth instructor and head of the child welfare department) यांनी केले आहे.

महावृक्षारोपण अभियान लागवड व संवर्धन याविषयी ग्रामपंचायतीने आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते. गेल्या दोन वर्षात कोविड (corona) काळात ऑक्सिजन (oxygen) न मिळाल्याने भारतात हजारो लोकांचे प्राण गेले. त्यामुळे मोफत मिळणार्‍या ऑक्सिजनसाठी लाखो रुपये खर्च करूनही तो वेळेवर मिळत नव्हता. म्हणून तो मोफत मिळावा यासाठी एक कोटी वृक्षारोपण संकल्प कार्यक्रम (Tree Plantation Resolution Program) हाती घेण्यात आला असून

त्याची सुरुवात नैताळे ग्रामपंचायतीचे 20 एकर क्षेत्रात चिंच, जांभूळ, आंबे, चिक्कू इत्यादीचे 4 हजार वृक्ष लागवड (Tree Plantation) करून पहिल्या ऑक्सिजन पार्क (Oxygen Park) ची निर्मिती केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे नितीन मोरे यांनी अभिनंदन केले. माजी प्राचार्य वि.दा. व्यवहारे यांनी एक कोटी वृक्षारोपण संकल्पनाची माहिती उपस्थित सेवेकरांना दिली.

याप्रसंगी नितीन मोरे, वि.दा. व्यवहारे यांचा सरपंच, उपसरपंच, नैताळे प्राथमिक शाळा, जनता विद्यालय, पार्वती इंग्लिश मीडियम, मॉर्डन इंग्लिश मीडियम, नैताळे वारकरी मंडळ, निफाड तालुक्यातील सेवेकरी यांच्यातर्फे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दहिफळे,

केदू नाना बोरगुडे, शंकर घायाळ, नवनाथ बोरगुडे, अरुण घायाळ, महाले, रामचंद्र निमसे, डॉ.उदावंत, विलास दरगुडे, दत्तु भवर, शिवाजी बोरगुडे, मुख्याध्यापक पांडूरंग कर्डिले, पार्वती इंग्लिश मीडियमचे अनिल बोरगुडे, मॉर्डन इंग्लिश स्कूलचे वाघ, जनता विद्यालय मुख्याध्यापिका सानप, ग्रामस्थ, विद्यार्थी व स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते.

5 हजार लागवड उद्दीष्ट नैताळे ग्रामपंचायत मालकीचे 20 एकर क्षेत्र गाजरवाडी रोड लगत असून त्यात गेल्या वर्षी चिंच, आंबे आदींची तीन हजार वृक्ष महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लावलेली आहे. आज या कार्यक्रमांतर्गत एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प आहे. तर पुढच्या वर्षी एक हजार वृक्ष लावून अशाप्रकारे पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प आहे. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व परिसरातील सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभत आहे.

– राजेंद्र दहिफळे, ग्रामविकास अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या