गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज; देहेरगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) कुऱ्हेगाव (Kurhegaon) येथील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेमार्फत (Shivdurg Conservation Tourism Organization) किल्ले देहेरगड (Dehergad Fort) येथे आज वृक्षारोपण करण्यात आले. हिरवांकुर फाउंडेशन (Hirvankur Foundation) मार्फत ५१ वृक्ष आणि पाचशे विविध वनस्पतींच्या बिया देण्यात आल्या होत्या. या सर्व वृक्षांचे आणि बियांचे किल्ले देहेरगडच्या पायथ्याला रोपण करण्यात आले. यावेळी अनेक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते…

गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तसेच महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या माध्यमातून साफसफाई, पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता, तसेच पावसाळ्यामध्ये बीजारोपणाबरोबरच वृक्षारोपणाची मोहीम राबवली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रत्येक गड किल्ल्याला (Fort) स्वराज्याचा अविभाज्य घटक म्हणून संबोधले आहे.याच गडकिल्ल्यांच्या भरोशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. परंतु आज साडेतीनशे वर्षानंतर या किल्ल्यांची वाईट अवस्था झाली असून या अवस्थेला संपूर्णपणे आपणच जबाबदार आहोत.

तसेच आपल्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत बघायचा असेल तर गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून याचा अभिमान उराशी बाळगून शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था या कार्यात उतरली असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *