Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअखेर 'तो' वृक्ष तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

अखेर ‘तो’ वृक्ष तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

चौकातील अंब्याच्या झाडाची अडचण होत असल्याने सुपारी देऊन झाड तोडण्याचा प्रकार चार दिवसांपुर्वी कॉलेजरोडच्या डिसुजा कॉलनीत समोर आला होता. या प्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चोरीच्या उद्देशाने भामट्यांनी रस्त्यावरील आंब्याचे झाड कापल्याची घटना डिसूजा कॉलनीत घडली. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून सोशल मिडीयावर या झाड कापण्याची बाब उघडकीस आल्याने महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण गणेश बोडके (रा.गणेशवाडीरोड पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोडके मनपा कर्मचारी असून शनिवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली होती. गजानन जनार्दन म्हात्रे मार्गावरील मेघा सोसायटीस लागून असलेले सार्वजनिक रस्त्यावरील 40 ते 45 फुट उंचीचे झाड अज्ञात भामट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून टाकला होता.

चोरीच्या उद्देशाने झालेली ही घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेजयांमध्ये कैद झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सोशल मिडीयावर त्याचे पडसाद उमटल्याने महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या