Friday, April 26, 2024
Homeनाशिकवृक्ष गणना वाढीव कामांची होणार चौकशी

वृक्ष गणना वाढीव कामांची होणार चौकशी

नाशिक । प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील वृक्ष गणनेचे ठेकेदार कंपनीकडुन झालेले वाढीव काम आता संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. वृक्ष गणना वाढीव कामात अनेक त्रुटी व संशयास्पद बाबी असल्याने तीन सदस्यांनी गंभीर आक्षेप घेतले आहे. महासभेची प्रशासकिय मंजुरी न घेता वाढीव रक्कम देण्यासाठीचे कार्योत्तर मंजुरीसाठी डॉकेट आले कसे असा प्रश्न झाला आहे. यामुळेच या संपुर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येऊन यासंदर्भातील सविस्तर अहवाल करावा असे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले…

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक अध्यक्ष तथा आयुक्त जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.10) रोजी झाली. या सभेत सहा विभागातील वृक्ष गणनेचे वाढील कामाचे सुधारित प्राकलन अवलोकनार्थ ठेवण्यात आले होते. या विषयाला आयुक्तांनी ब्रेक लावत यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.

मुंबईतील एका एजन्सीकडुन शहरात सन 2016 – 17 या कालावधीत शहरातील वृक्ष गणनेचे काम झाले आहे. साडेआठ रुपये प्रति वृक्ष गणना करणे अशी कामाची निवीदा मंजुर करण्यात आली होती. यानुसार याकामाकरिता 2 कोटी 13 लाख 75 हजार रु. इतक्या कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. यात संबंधीत कंपनीने 25 लाख वृक्ष गणनेने उद्दीेष्ट पुर्ण केल्यानंतर शिल्लक काम सुरु ठेवल्यानंतर 47.95 लाख वृक्ष आढळून आले असे सांगत या कंपनीने सुधारित 4 कोटी 18 लाख 95 हजार रुपयाचे सुधारित प्राकलन कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवले होते.

या सुधारित प्राकलनास चार महासभांत तहकुब ठेवण्यात आल्यानंतर पाचव्या महासभेत कायदेशिर सल्ला घेऊन पुन्हा महासभेवर ठेवण्याचा आदेश नगरसेवकाच्या सुचनेवरुन महापौरांनी दिला होता. यात कायदेशिर सल्लागारांनी यातील कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

अशाप्रकारे वादात असलेल्या विषयाला कार्योत्तर मंजुरीचा प्रयत्न काही नगरसेवकांनी सुरू केल्यानंतर चर्चेत आलेल्या विषयाला वृक्ष समिती सदस्य अ‍ॅड. अजिंक्य साने, चंद्रकांत खाडे व डॉ. वर्षा भालेराव यांनी विरोध केला. या विषयांती गंभीरता व भविष्यात सदस्यांना त्रास होणार असल्याने वृक्ष गणनेच्या सुधारित प्राकलनाला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली. सदस्यांच्या मागणीनंतर आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देत याचा अहवाल पुढील सभेत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

वृक्ष गणनेतील गंभीर त्रुटीकडे वेधले लक्ष

शहरात झालेल्या वृक्ष गणनेत अनेक गंभीर त्रुटी असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. यात जीईओ टँगींग मध्ये दर्शवित असलेल्या आकडाचे झाड प्रत्यक्ष जागेवर दिसत नाही. नंतर केलेल्या वृक्ष गणनेचा सिरीयल क्रमांक 8 सर्वच ठिकाणी दिसत असल्याने हा प्रकार संशयास्पद आहे. तसेच शासन निर्णयानुसार विना निवीदा काम 3 लाखापेक्षा जास्त रक्कमेचे करता येणार नाही, असे असतांना या नियमाचे उल्लंघन झाले आहे. तसेच हे काम मंजुरीसाठी काही नगरसेवक पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.

एक्सप्रेशेन इंटरेसनुसार रिप्लॅटेशननुसार निविदा

शहरातील गत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या झालेल्या अंतर्गत व बाह्य रस्त्यात येणारी मोठी झाडांसंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भातील मागणी सदस्य डॉ. वर्षा भालेराव यांनी केली होती. यासंदर्भात आयुक्तांनी याबाबत 5 वेळा निवीदा काढण्यात आल्या. शेवटी 1 निवीदा आल्यामुळे आता एक्सप्रेशेन ऑफ इंटरेसनुसार कामाची निवीदा काढली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच झाडाच्या मुळाशी अ‍ॅसिड टाकुन झाडे मारण्याचे प्रकार होत असल्याने यापुढे वाळलेले एकापेक्षा जास्त झाडे असल्यास त्याठिकाणी जाऊन पीएच मीटर किंवा पेपरने तपासणी करावी, मगच अशी झाडे तोडण्यास परवानगी द्यावी अशी भालेराव यांनी मागणी आयुक्तांनी मान्य केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या