Wednesday, April 24, 2024
Homeनगरशासन धोरण जाहीर, शिक्षकांच्या सहा टप्प्यांत होणार बदल्या

शासन धोरण जाहीर, शिक्षकांच्या सहा टप्प्यांत होणार बदल्या

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात शासनाने धोरण घेतले आहे.

- Advertisement -

यासाठी नव्याने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी 1 मे ते 31 मे या कालावधीत बदल्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या शासन निर्णयानुसार एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीला पात्र ठरणार आहेत.

अनेक वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या शासनासाठी डोकेदुखी ठरत होत्या. अखेर व्यापक भूमिका घेऊन आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून आलेल्या अहवालानुसार नव्याने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे .त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या आता तरी अपेक्षेप्रमाणे होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

31 मार्च ठरणार अवघड क्षेत्र

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र असलेल्या कोणत्या शाळा अवघड क्षेत्रात आहेत त्याची निश्चिती दर तीन वर्षांनी 31 मार्चपूर्वी करण्यात येणार आहेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्धारित करण्यात आले आहेत त्यात उपजिल्हाधिकारी निवडणूक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांचा समावेश असणार आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

सहा टप्प्यांत होणार बदल्या-

बदल्यांसाठी एकूण सहा टप्पे निश्चित करण्यात आले आहे. टप्पा एक मध्ये पदांचे समानीकरण करण्यात येईल. विशेष संवर्ग शिक्षक एक, विशेष संवर्ग शिक्षक भाग 2, बदलीपात्र शिक्षक. शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या विशेष असं वर्गांमध्ये पक्षाघाताने आजारी, दिव्यांग शिक्षक, हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, एकच किडनी असलेले, यकृत प्रत्यारोपण , कर्करोगाने आजारी, मेंदूचा आजार ,थॅलेसिमिया विकारग्रस्त मुलांचे पालक, माजी सैनिक, आजी सैनिक यांच्या पत्नी ,विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्त्या ,घटस्फोटीत व 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक. स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा, मुलगी, नातू ,नात यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शिक्षकांचा जोडीदार हृदयशस्त्रक्रिया झालेला आहे. जन्मापासून एकच किडनी, यकृत प्रत्यारोपण, कर्करोगाने आजारी, मेंदूचा आजार व थॅलेसीमिया विकार आहेत अशा शिक्षकांना देखील लाभ मिळणार आहे.

या आहेत धोरणात्मक बाबी

शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत बदल्यांसाठी एका नोडल ऑफिसर ची नियुक्ती करावी लागणार. एका कार्यक्रमात अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार. ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ती माहिती मिळेल. कर्मचार्‍यांने राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार .विनंती बदलीने कोणताही पदग्रहण अवधी नाही. बदली प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यास अधिकारी कारवाईस पात्र. 1मे ते 31 मे चा कालावधीत बदल्या करता येणार .न्यायालयीन प्रक्रिया झाल्या असल्यास न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही शाळेतील दहा टक्के पदापेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नाहीत. समानि करण्याच्या जागा अगोदर निश्चित करण्यात याव्यात. यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आली आहे.

शिक्षक करू शकणार तक्रार-

नोकरी संदर्भात अनियमितता झाली असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहेत. जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षणाधिकारी यांचा समितीत समावेश असणार आहे .बदली झाल्यानंतर सात दिवसात तक्रार करता येईल .तर समितीने 30 दिवसाच्या आत निर्णय देणे अपेक्षित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास विभागीय आयुक्तांकडे सात दिवसाच्या आत तक्रार करता येईल. आयुक्तांनी तीस दिवसाच्या आत निर्णय देणे अपेक्षित आहेत. जे शिक्षक बदली प्रक्रियेसाठी चुकीची माहिती सादर करतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

– बदलीसाठी 30 शाळांची निवड करता येणार

– दोन शाळांतील अंतरासाठी प्राधिकरणाची निश्चिती

– विविध लाभासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

– आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जागा 100% भरल्या जाणार

– आदिवासी क्षेत्रात तीन वर्षे सेवा केलेले बदलीस पात्र

– पती-पत्नीला एकच मानणार

– संवर्गातील शिक्षकांच्या टप्प्याटप्प्याने होणार बदल्या

– सेवाज्येष्ठतेचा होणार लाभ

- Advertisment -

ताज्या बातम्या