Friday, April 26, 2024
Homeनाशिकमनपा नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनपा नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आनंदवली शिवारातील (Anandavali Shivar) सर्वे क्रमांक ६५/१/१ अ मध्ये सुरु असलेल्या बांधकामावरून गेल्या महिनाभरापासून वादंग सुरू आहे. मनसे नगरसेवक सलीम शेख (Salim Shaikh) यांनी स्थायी समितीच्या सभेत (Standing Committee Meeting) हा मुद्दा उपस्थित करत अनधिकृत बांधकामाला (Illegal construction) प्रोत्साहन दिल्याप्रकरणी उपअभियंता संजय अग्रवाल (Sanjay Agarwal) यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या…

- Advertisement -

यानंतर संबंधित बांधकाम व्यवसायिकांना नगररचना विभागाने (Town Planning Department) नोटिसादेखील काढल्या होत्या तर आता अंतिम नोटीसदेखील बजावण्यात आल्याचे समजते.

त्याप्रमाणे नुकताच झालेल्या महासभेतदेखील (General Body Meeting) नगरसेवक शेख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे समजते. मात्र त्यांना नव्या ठिकाणी जाण्याचे आदेश न मिळाल्यामुळे संभ्रम कायम असल्याची चर्चा आहे.

बांधकामाला नियमानुसार परवानगी दिल्याचा दावा नगररचना विभागाने केला होता, मात्र कागदावर नियमानुसार काम दिसत असले तरी प्रत्यक्षात जागेवर परिस्थिती वेगळी असल्याचा आरोप करत गोदापार्कसाठी (Godapark) आरक्षित जागाही संबंधित बांधकाम व्यावसायिकाने गिळंकृत केल्याचा आरोप नगरसेवक शेख यांनी केला आहे.

यासंर्भात जलसंपदा मंत्र्यांनादेखील पत्र त्यांनी दिले आहे. तर आंदोलनाचा (Agitation) इशारा शेख यांनी दिल्यानंतर नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक अशोक फकीरराव सोपे, शिंदे अ‍ॅण्ड शिंदे बिल्डर्स, वास्तुविशारद संजय नाईक यांना नोटीस बजावली होती. दरम्यान आता नगररचना विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या