Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरएलसीबी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे

एलसीबी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा पोलीस दलातील (Ahmednagar District Police Force) जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया (Transfer process within the district) नुकतीच पार पडली. प्रशासकीय व विनंती अशा तीनशे बदल्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP. Manoj Patil) यांनी आदेश (Order) काढले. मात्र या आदेशात स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) (LCB) पोलिसांच्या बदल्या (Police Transfer) करण्यात आलेल्या नाही. त्यांच्या बदल्याबाबत एसपी पाटील स्वतंत्र आदेश काढणार (SP. Manoj Patil will issue a separate order) आहेत. यामुळे मोठी उत्सुकता असलेल्या एलसीबीच्या (LCB) बदल्यांचे एसपींनी भिजत घोंगडे ठेवले आहे.

- Advertisement -

30 आणि 31 जुलै रोजी एसपी पाटील यांच्या देखरेखीखाली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या (District Police Establishment Board) पॅनलद्वारे प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पडण्यात आली. यानंतर बदल्याबाबत आदेश एसपी पाटील यांनी जारी केले. यामध्ये प्रशासकीय पातळीवर 173 बदल्या होत्या. त्यातील 39 कर्मचार्‍यांच्या बदल्यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. तर 20 जणांच्या बदल्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. यामध्ये एलसीबीच्या (LCB) 16 कर्मचार्‍यांच्या समावेश आहे. या कर्मचार्‍यांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी एलसीबीत झाला आहे. त्यांच्या बदल्याबाबत स्वतंत्र आदेश निघणार का त्यांना पुन्हा वर्षभर मुदतवाढ मिळणार याबाबत पोलीस दलात उलटसुलट चर्चा (discussion) झडत आहे.

9 ऑगस्टपूर्वी आदेश निघणे आवश्यक

दोन दिवस जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात बदलीपात्र सर्वच पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, एलसीबीच्या कर्मचार्‍यांना यातून वगळण्यात आल्याने चर्चेला पेव फुटले आहे. प्रत्यक्षात 9 ऑगस्टपूर्वी बदलीचे स्वतंत्र आदेश निघणे आवश्यक आहे. परंतु, तशी हालचाल पोलीस दलात दिसत नाही. यामुळे एलसीबी कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार का नाही, याचीच चर्चा पोलीस दलात आहे.

इच्छुकांचा हिरमोड

एलसीबी जिल्हा पोलीस दलातील वजनदार शाखा मानली जाते. यामुळे येथे येण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. तसेच यावर्षी देखील पोलीस कर्मचार्‍यांनी येथे येण्यासाठी प्रयत्न केले. बदली प्रक्रियेत तीनशे पेक्षा जास्त अर्ज एलसीबीसाठी आले होते. यामुळेच तर एसपींनी या बदलीसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे घोषित केले असावे, असा एक अंदाज आहे. ते काहीही असो परंतु, एलसीबीत येणार्‍या अनेकांचा या स्वतंत्र आदेशामुळे हिरमोड झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या