Saturday, April 27, 2024
Homeनगर59 आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्या

59 आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया (Transfer process of Ahmednagar Zilla Parishad employees) पूर्ण झाली असून यात प्रशासकीय (Administrative), विनंती आणि आपसी या प्रकारात 234 कर्मचार्‍यांच्या बदल्या (Transfer) झाल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी आरोग्य विभागातील (Department of Health) 59 कर्मचार्‍यांची बदलीची प्रक्रिया (transfer process) पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे सात ते आठ वर्षे पेसा (आदिवासी भाग) क्षेत्रात काम केल्यानंतर विनंती बदलीची मागणी (Demand for replacement) करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून (Zilla Parishad Administration) परिचरांना बदली प्रक्रियेत डावलण्यात आल्याचे परिचारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

20 तारखेपासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची विभागानिहाय बदली प्रक्रिया करण्यात आली. सुट्टीचे दिवस वगळून प्रत्येकी दिवशी दोन ते तिन विभागातील कर्मचार्‍यांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. मंगळवारी आरोग्य विभागातील आरोग्य सेवक महिला 45, आरोग्य सेवक पुरूष 1 आणि आरोग्य पर्यवेक्षक (Health Supervisor) एक यांची बदली प्रक्रिया करण्यात आली. आज बुधवारी परिचरांच्या बदलीची प्रक्रिया होणार होती. मात्र, अचानक ती रद्द करण्यात आली आहे.

दुसरीकडे शासकीय नियमानुसार पेसा क्षेत्रात तीन वर्षे काम केल्यानंतर संबंधित कर्मचारी विनंती बदलीस पात्र होतो. जिल्हा परिषदेतील आठ परिचर गटातील कर्मचारी गेल्या सात ते आठ वर्षांपासून पेसा क्षेत्रात कार्यरत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी पेसातून इच्छित स्थळी बदली करण्यासाठी अनेकदा प्रशासनाला विनंती केली. मात्र, प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. मागील वर्षी त्यांनी बदलीची मागणी केली होती. परंतु मागील वर्षी प्रशासनाने परिचरांच्या बदल्या केल्या नाहीत.

परिचरांच्या बदल्यांचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. नियमानुसार वर्षभर ते कधीही या परिचरांच्या बदल्या करू शकतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात आपली बदली होईल, या आशेवर हे कर्मचारी होते. परंतु वर्षभरात बदली झाली नाही. आज (बुधवारी) परिचर यांची बदली प्रक्रिया होणार होती. मात्र काल (मंगळवारी) सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून परिचरांच्या बदल्या यंदाही होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे बदलीपात्र परिचर कर्मचार्‍यांचा पुन्हा हिरमोड झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या