उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशिक्षण

jalgaon-digital
3 Min Read

Training programs to accelerate development of industries

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याच्या एकूण निर्यातीत ( Export )नाशिक जिल्ह्याचा निर्यातीचा टक्का हा केवळ पाच टक्के एवढाच आहे. निर्यातीबद्दलची भिती किंवा अज्ञान हे यामागचे मुळ कारण असल्याचे ओळखून आयमा व सिऑम (SIOM)यांनी संयुक्त विद्यमाने निर्यातीचे ज्ञान देणारे सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात येत असल्याची घोषणा आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

आयमा व सिम्बायोसिस इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सिऑम) यांच्या संयक्त विद्यमाने आयमा रिक्रिएशन सेंटर येते पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, सिऑमच्या संचालिका डॉ.वंदना सोनवणे, आयमाचे सरचिटणिस ललित बूब, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, हर्षद ब्राम्हणकर, रवी महादेवपूरकर, सिध्देश रायकर हे होते.

या प्रशिक्षणाची माहिती सांगताना पांचाळ यांनी लहान उद्योगांना मोठे कसे करता येईल, नाशिकच्या उद्योगांची निर्यातक्षमता कशी वाढवता येईल यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.त्यासाठी निर्यातीचे सखोल ज्ञान असलेले तज्ज्ञ व्यवस्थापक तयार करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. पुढील 2 वर्षात 100 हून अधिक निर्याततज्ज्ञ व्यवस्थापक तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात निर्यात कोणत्या देशात करायची, त्या देशाची निवड कशी करायची, एक्सपोर्ट मार्केटिंग कशी करायची, यासाठी कोणांशी चर्चा करायची, एक्सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा शोधायच्या यासह विविध क्षेत्राच्या सात टप्पांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 25 जणांच्या बॅचच्या माध्यमातून तीन ते चार महिन्यांचा हा कोर्स राहणा असल्याचे डॉ. वंदना सोनवणे यांनी सांगितले. नवीन उद्योजकांना एक्सपोर्ट करण्याची इच्छा असते मात्र योग्य दिशा मिळत नाही यासाठी या एक्सपोर्ट मॅनेजर कोर्स महत्वाचा दूवा ठरणार आहे. जास्तीत उद्योजकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन हर्षद ब्राम्हणकर यांनी केले.

निर्यातीचा टक्का कमी दिसत असला तरी तो मोठ्या प्रमाणात मुंबईतील गुंतवणूक दारांच्या नावावर वर्ग होत आहे. याला कारण हे निर्यातीची भिती, अज्ञान,जागतीक बाजारपेठेचे अपूरे ज्ञान हे होय. या कमतरता पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याच ललित बूब यांनी सांगितले. या प्रशिक्षणासाठी पदवीधर उमेदवाराला प्रवेश घेता येणार असून, उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी उद्योगांच्या कामाच्या दिवशी म्हणजेच रविवारी हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

उद्योगांचा निर्यातीचा टक्का

राज्याच्या एकूण निर्यातीत नाशिकचा टक्का हा 5 टक्कांपर्यंत जातो. म्हणजेच 2021-22 या काळात राज्यातून 5.45 लाख कोटी रुपयांच्या निर्यात झाली. त्यात नाशिक जिल्हातून केवळ 20 हजार 600 कोटी रुपयांची निर्यात झाल्याचे दिसून येत आहे. यातील पहिल्या दहा उत्पादनांमध्ये कांदा, द्राक्ष, औषधे, पॉलिमर, पॉलिस्टर, वाहने, डाळींब, पॅनल्स व कॅपॅसिटर्स यांचा समावेश आहे. यातील बहुतांश उत्पादने ही युएसए, बांगला देश, अरब अमिरात, जर्मनी, नेदरलँड, द. आफ्रिका, युके, रशिया, इटली या देशांना निर्यात केलेले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *