Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकचालक-वाहक पदासाठी २१५ महिलांना प्रशिक्षण

चालक-वाहक पदासाठी २१५ महिलांना प्रशिक्षण

नाशिक | Nashik
राज्य परिवहन महामंडळाने २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. त्यांत आदिवासी भागातील २१ महिला आहेत. एसटीत चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येईल.

त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होणार आहेत. बसगाडय़ांचे सारथ्य महिलाही करणार असून त्यांना चालकाबरोबरच वाहकाचीही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे एसटीत सध्या ४, ५०० महिला वाहक आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करतील.

- Advertisement -

महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली. सर्वसाधारण भागांतील १९४ आणि आदिवासी भागातील २१ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती प्रशिक्षण आणि अंतिम चाचणी घेतल्यानंतर या महिला चालक २०२१ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते.

परंतु करोनामुळे त्यांचे प्रशिक्षणच थांबले. या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. भोसरी येथे एसटीचे चाचणी पथ असून तेथे अंतिम चाचणी होऊन अंतिम निवड करण्यात येईल.

नियुक्ती नाशिक, पुणे, वर्धा येथे !
एसटी चालक-वाहक पदासाठी आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २१ महिला आदिवासी भागातील आहेत. उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील अाहेत. त्यांची नियुक्ती पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, सांगली विभागांत करण्यात येणार असल्याचे कळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या