Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘सायबरदूत’साठी आज प्रशिक्षण शिबिर

‘सायबरदूत’साठी आज प्रशिक्षण शिबिर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलली आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी आता शालेय विद्यार्थी व शिक्षकांना सायबर साक्षर करून ‘सायबरदूत’ बनवले जाणार आहे. जेणे करून हे विद्यार्थी सायबर गुन्ह्यांविरोधी जनजागृती करणार आहे.आज (दि.1) सोमवारी शहर पोलीस तीनशेहून अधिक विद्यार्थी तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे. पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

- Advertisement -

ऑनलाइन फसवणूक करणे, मोबाइल हॅक करून डाटा चोरी करणे, अश्लील चॅटिंग व व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करणे यांसह टीमव्हावर, एनीडेस्कसारखे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्यासह मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवत परस्पर रक्कम काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हे टाळण्यासाठी सायबर पोलीस उपाययोजना व जनजागृती करत आहे.सायबर जनजागृती कार्यशाळेत सहभाग नोंदविणार्‍यास ‘सायबरदूत’चे कामकाज कसे करावे याबाबत सायबरतज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी व अंमलदार मार्गदर्शन करतील.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्रशिक्षित सायबरदूत शहरातील नागरिक, शाळा व महाविद्यालयामधील इतर विद्यार्थ्यांना सायबर साक्षर करतील. ‘सायबरदूत’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र व ‘सायबरदूत’चा बॅच देण्यात येणार आहे. बॅच मिळालेले सायबरदूत स्वतः सायबर शिक्षित झाल्याने समाजातील इतर घटकांना सायबर साक्षर करतील. सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करतील. विविध ठिकाणी सायबर जनजागृती करून व्याख्यान देतील. या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना आवश्यक मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या