Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबार‘टिकीया’ ऍप पाहून घेतले मोटरसायकल चोरीचे प्रशिक्षण

‘टिकीया’ ऍप पाहून घेतले मोटरसायकल चोरीचे प्रशिक्षण

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथे मोटरसायकल चोरी करणार्‍या चोरटयास अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील ‘टिकीया’ ऍप पाहून याने चोरीचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथे गेल्या पाच, सहा महिन्यांपासून रात्रीच्या वेळी एकसारख्या मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर,

जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.भोजराज धनगर, अनिल राठोड, लिनेश पाडवी, चालक राजू कोकणी, विशाल गावीत, होमगार्ड प्रकाश गावीत यांनी विसरवाडी व खांडबारा येथील चोरांविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली.

त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर आरोपी बाळा छोटीराम गायकवाड (वय २१ रा.वरपाडा पोस्ट पिंपळगाव ता.साक्री) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने विसरवाडी, खांडबारा, धुळे जिल्ह्यातील छडवेल, नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद, जायखेडा येथून एकुण सहा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याकडुन एकुण सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर आरोपीने सोशल मीडियावर असलेले ‘टिकीया’ ऍप पाहुन मोटरसायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली. मोटारसायकल चोराला अटक करुन मुद्देमाल जप्त केल्यामुळे विसरवाडी पोलीसांचे अभिनंदन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या