Wednesday, April 24, 2024
Homeनगरहम नहीं सुधरेंगे..

हम नहीं सुधरेंगे..

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील वाहतूक कोंडीबरोबरच बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांच्या त्रासाने नगरकरांसह शहरात खरेदीसाठी येणारे ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. (Traffic issue ahmednagar)

- Advertisement -

पोलिसांकडून (police) मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागात लागू असलेली ‘नो एन्ट्री’ केवळ नावालाच असल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे वाहनांवर कारवाई केल्यांनतरही शहरातील नागरिक सुधारण्याचे नाव घेत नाहीत ही दुर्देवाची बाब आहे. ‘हम नहीं सुधरेंगे’च्या अविर्भावात वावरत वाहनचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.

भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस उलटली, ८ जण ठार

रस्त्यांची दैना, वाहन पार्किंगचा अभाव, रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने, फूटपाथ अडवून बसणारे फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालकांचे अनधिकृत थांबे यामुळे नगरमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. पार्किंगवरून होणारे वाद हाणामाऱ्यांपर्यंत तसेच खुनी हल्ला करण्यापर्यंत जात असल्याने शहरासह कापड बाजारातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याकडे महानगरपालिका आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देवून ही समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

सण, उत्सव, लग्नसराई आदींच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक येतात परंतु पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने उभी करताना होणारी कसरत तसेच बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेकजण खरेदीसाठी आल्यानंतर दुकानांबाहेरच वाहने उभी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

Cyclone Asani : असानी चक्रीवादळाचा धोका, किनारपट्टीवर हाय अलर्ट… NDRF सज्ज

चाळीस फूटांचा रस्ता पण….

कापड बाजारातील रस्त्याची रुंदी कागदोपत्री चाळीस फूट आहे. प्रत्यक्षात, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे दिवसा दहा ते बारा फुटांचा तर सायंकाळी गर्दी वाढल्यानंतर अवघ्या पाच ते सात फुटांचा रस्ता वापरण्यास मिळतो. त्यामुळे ग्राहकांना तारेवरची कसरत करत ग्राहकांना दुकानात जावे लागते.पोलिसांचे दुर्लक्ष

पोलिसांचे दुर्लक्ष

केवळ कापड बाजारातच नव्हे, तर शहरातील अनेक रस्त्यांवर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. याला बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणारे प्रथमदर्शनी जबाबदार असले तरी त्यांना शिस्त लावण्यासाठीची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

राज्याच्या राजकारणात नवी चर्चा; MIM महाविकास आघाडीसोबत जाणार?

दाळमंडई, आडतेबाजार, दाणेडबरा, तापकीर गल्ली या भागातील रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. या परिसरात खरेदीसाठी ग्राहकांसह ग्रामीण भागातील व्यापारी वर्गाची मोठी वर्दळ असते. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा प्रशासन तसेच वाहतूक पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

अनिल गट्टाणी (व्यापारी )

- Advertisment -

ताज्या बातम्या