Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवाहतूक बेटाचे सुशोभीकरण करावे

वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करावे

नवीन नाशिक | New Nashik (प्रतिनिधी)

स्टेट बँक चौक येथील वाहतूक बेट सुशोभिकरण करण्यात यावे यासंदर्भातील निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांना देण्यात आले.

- Advertisement -

नवीन नाशिक परिसरातील स्टेट बँक चौक हा सतत गजबजलेला चौक म्हणून ओळखला जातो. तसेच या ठिकाणी असलेल्या चौपाटीवर खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली असते. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमध्ये विविध विकास कामांची सुरुवात झाली आहे तर काही कामे पूर्णत्वास देखील आली आहेत.

सुशोभीकरणाकडे देखील या कामामध्ये लक्ष दिले गेले आहे. मात्र नवीन नाशकातील मुख्य चौक असलेला स्टेट बँक चौक याठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या वाहतूक बेटाचा प्रशासनाला विसर पडला आहे.

मनपा प्रशासनाने याकडे देखील लक्ष देऊन नवीन नाशिक ची शोभा वाढवणाऱ्या या चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे विभागीय अधिकारी यांना करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष भुजबळ, राहुल कमानकर, सुनील घुगे, विक्रांत डहाळे, डॉ. संदीप चव्हाण, नवराज रामराजे, अविनाश मालुंजकर, मनोज चव्हाण, अक्षय परदेशी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या