Saturday, April 27, 2024
Homeधुळेबाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु

बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु

शिरपूर । प्रतिनिधी Shirpur

आ.अमरिशभाई पटेल (MLA Amrishbhai Patel) यांनी पुढाकार घेऊन व्यापारी (Merchant) व हमाल प्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन तपशीलवार चर्चा केली व 13.50 टक्के हमालीचे दर वाढवून देण्याबाबत व्यापारी व हमाली संघटनांनी संमती दर्शविली. त्यानंतर शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत (Shirpur Agricultural Produce Market Committee) खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाले.

- Advertisement -

व्यापारी हमालीमध्ये वाढ करण्याच्या मागणीवरुन समितीमधील व्यापार्‍यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. हमालीचे वाढीव दर निश्चित करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचे (Chairman Narendrasingh Sisodia) सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, व्यापारी व हमाल संघटना यांच्यामध्ये तीन बैठका झाल्या.

व्यापारी 10 टक्के वाढ करण्यास तयार होते, परंतु हमाल प्रतिनिधी 16 टक्के पेक्षा कमी वाढ मान्य करण्यास तयार नव्हते, शेतकर्‍यांच्या मालाची विक्री होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता.

आ.अमरिशभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन व्यापारी व हमाल प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन तपशीलवार चर्चा केल्यानंतर 13.50 टक्के हमालीचे दर वाढवून देण्याबाबत व्यापारी व हमाली संघटनांचे एकमत केले व त्यास दोन्ही संघटनांनी त्यांच्या निर्णयाला संमती दिल्यामुळे दि. 15 फेब्रुवारीपासून कृषि उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमीत सुरु झाले.

चर्चेला व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष के.आर.अग्रवाल, व्यापारी संचालक युवराज जैन, मोहन पाटील, जितेंद्र राजपूत, गोटू शेठ, पप्पू शेठ, राजू शेठ तसेच हमाल मापाडी संघटनेमार्फत शिवाजी वाळुंजकर, रोहिदास मुकरदम, पांडुरंग मुकरदम, प्रकाश रुखमे, कृषि उत्पन्न बाजार समितीच संचालक अविनाश पाटील, नरेश पाटील, हिरालाल पावरा आदी उपस्थित होते. हमाली वाढीचा प्रश्न आ. अमरिशभाई पटेल यांच्या मध्यस्थीने मिटला असून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु होत आहेत. म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या