Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकठकसेन व्यापार्‍याचा कांदा उत्पादकास गंडा

ठकसेन व्यापार्‍याचा कांदा उत्पादकास गंडा

मटाने । वार्ताहर Matane

नाशिक येथे कांदा विक्रीस आणा चांगला भाव मिळेल, असे आमिष दाखवून येथील कांदा उत्पादक शेतकरी नानाजी निंबा साबळे यांचा 80 हजार रुपये किमतीचा 29 क्विंटल कांदा नाशिक पेठरोडवरील मार्केट यार्डमधून घेऊन फरार झालेल्या चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

मटाने येथील शेतकरी नानाजी साबळे यांनी संशयित कांदा व्यापारी इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून पिकअप वाहनातून नाशिक येथे कांदा विक्रीसाठी नेला होता. यावेळी अन्सारीने पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे बोलवले. येथील मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत आपापसात व्यवहार झाला.

संशयिताने 20 रुपये किलो दर ठरवत गोदामात कांदा उतरवत त्याचे बिलही बनवले. मात्र मालाचे पैसे मागितले असता संशयित साबळे यांना पुन्हा मालेगाव स्टॅण्ड नाशिक येथे घेऊन आला. या ठिकाणी साबळे यांना चहा पाजला आणि मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून तेथून पळ काढला. त्यानंतर साबळे यांनी फोन केला असता मोबाईल बंद झाल्याने पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली असता तोपर्यंत तेथील कांदाही गायब झाला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या