Thursday, April 25, 2024
Homeजळगावव्यापारी संघटना सरसावल्या

व्यापारी संघटना सरसावल्या

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध 1 जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे व्यापार पूर्ववत करणयाची परवानगी मिळावी यामागणीसाठी व्यापारी संघटना सरसावल्या आहेत.

- Advertisement -

कॉन्फेडरेशन ऑफ़ आँल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. तर शासनाच्या नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असो.

राज्यात 1 जून पासून सर्वच व्यापार पुर्ण वेळ सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे राज्यातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.

अन्य राज्यात सर्व प्रकारचे व्यापार सुरु आहे. यापुढे बंद राहिल्यास महाराष्ट्रातील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधी ही भरून निघणार नाही, मागील दोन महिन्यात बंद मुळे सर्व व्यापारी बंधुंचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता कोणतेही कडक निर्बंध न लावता 1 जूनपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरु करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात दोन महिने बंद काळात महानगरपालिका दुकानांचे भाडे , इतर कर , लाईट बिल , कर्जावरील व्याज , माफ करुन अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करुन विशेष आर्थिक पँकेज द्यावे, अशी मागणी राज्य कॅट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया , जिल्हा अध्यक्ष संजय शाह यांनी केली आहे .

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध 1 जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे.

जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललीत बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील हजारो व्यापारी बांधवांनी पहिल्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पुन्हा दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेऊन प्रचंड आर्थिक नुकसान सोसले आहे.

यातील कितीतरी व्यापारी बांधवांचे मनोधैर्य आर्थिक स्रोत बंद झाल्याने अक्षरशः कोलमडून पडले आलेले आहे. लॉकडाऊन संदर्भात दि. 1 जून 2021 पासून राज्य शासनाकडून नवीन नियम लागू होणार आहेत. तरी सखोल विचार करून नवीन नियम लागू करतांना थांबलेले अर्थचक्र पूर्ववत सुरु होण्याबाबत व निर्माण झालेली तूट भरून निघण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलावीत अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या