Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील ट्रॅक्टर चोरणारी राहात्याची टोळी जेरबंद

श्रीरामपुरातील ट्रॅक्टर चोरणारी राहात्याची टोळी जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका व परिसरातून ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीस काल श्रीरामपूर पोलिसांनी चार जणांना जेरबंद कले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12,90,000/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात राहाता तालुक्यातील तिघेजण असून चौथा हा वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथील आरोपी आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदीप मिटके यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक यांनी श्रीरामपूर शहर तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रघुनाथ नानासाहेब उघडे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे राहते घरासमोरुन दि. 24 जून 2022 रोजी रात्री चोरीला गेला होता, त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 554 / 2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस करत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपूर परिसरात परत ट्रॅक्टर चारणारी टोळी येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना सांगुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक रवाना करण्यात आले.

या पोलीस पथकाने सापळा लावुन यातील किरण शांताराम लासुरे-(वय 25) प्रल्हाद गोरक्षनाथ बरवंट (वय 45) दोघेही रा. शिंगवे, ता. राहाता, रामा बाळासाहेब यादव (वय 29) रा. 14 नं. चारी, राहाता, ता. राहता, मच्छिंद्र भाऊसाहेब गायकवाड, (वय 27) रा. बाबतारा, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद यांना जेरबंद करुन त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करुन त्यांचेकडून पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12 लाख 90 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 229/2022 भादवि कलम 379, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 386/2022 भादंवि कलम 379 असे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बढे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या