ट्रॅक्टर अपघात मृत्यू प्रकरण : आरोपीस यावल न्यायालयाने सुनावली सहा महिने शिक्षा

jalgaon-digital
2 Min Read

भुसावळ / यावल – Bhusaval / Yaval –

भरधाव वेगाने ट्रॅक्टर (Tractor) चालविल्याने एकाच्या मृत्यूस (death) कारणीभूत ठरल्याने डांभुर्णी येथील आरोपी प्रकाश भिमसिंग बारेला यास यावल न्यायालयाने (Yaval Court) दिला. १४ जानेवारी रोजी सहा महिने कारावासाची (imprisonment) शिक्षा सुनावली.

दि. १७ एप्रिल २०१७ रोजी साकळी ता. यावल शिवारात डांभुर्णी ते साकळी रोडवर आरोपी प्रकाश बारेला याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व हयगयीने चालवले व त्यामुळे ते पाटचारीत पलटी झाले होते. ट्रॅक्टर पलटी झाल्याने सुकलाल लालसिंग बारेला हा दाबला जाऊन मरण पावला होता.

याप्रकरणी यावल न्यायालयात न्यायाधीश एम एस बनचरे यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी वकील नितीन खरे यांनी सरकार तर्फे एकुण ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.

या खटल्यात विशेष म्हणजे सरकारी वकील नितीन खरे यांनी आरोपीचा लहान मुलगा आकाश याची महत्वपूर्ण साक्ष नोंदविली. आकाश बारेला याने सत्य परिस्थिती न्यायालयात सांगीतली व अपघाताचे वेळी त्याचे वडील हेच सदर ट्रॅक्टर चालवीत होते हे कथन केले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांनी केला.

न्या. एम एस बनचरे यांनी आरोपी प्रकाश बारेला यास याप्रकरणी दोषी धरून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पाच हजार रुपये नुकसान भरपाई मयत सुकलाल चे वडील लालसिंग बारेला यास देण्याचा आदेश दिला.

या खटल्यात सरकारी वकील नितीन खरे यांनी तर आरोपी प्रकाश बारेला तर्फे अॅड. गौरव पाटील यांनी काम पाहिले. सरकारी वकील नितीन खरे यांना पैरवी अधिकारी हे. कॉ. उल्हास राणे यांनी मदत केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *