Friday, April 26, 2024
HomeनाशिकPhoto|Video सावधान ! नाशिककर टोईंग व्हॅन येत आहे!

Photo|Video सावधान ! नाशिककर टोईंग व्हॅन येत आहे!

नाशिक | Nashik

शहरात होणाऱ्या बेकायदा पार्किंगविरोधात (Against illegal parking) वाहतूक शाखेने (traffic Police) कठोर पाऊल उचलली असून, याविरोधात आजपासून कारवाईला सुरवात झाली.

- Advertisement -

दरम्यान आज वकील वाडी, एम जी (MG Road) रोड, प्रधान पार्क आदी सह सीबीएस (CBS) व शालिमार (Shalimar) भागातील दहा ठिकाणे, महामार्ग बस स्थानकसमोरील (Highway bus station) रस्ता, सीटी सेंटर मॉल परिसर(City Center Mall), रविवार कारंजा (RK) आणि पंचवटीतील (Panchavti) पाच नो पार्किंग असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. कालपासून सुरू झालेल्या टोईंग व्हॅनमुळे बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यावेळी चार टेम्पोंसह तीन क्रेन प्रत्यक्ष कारवाई (Direct action) करतांना दिसून आले. या कारवाईत टोईंग केलेली वाहने शरणपूररोडवरील (Sharanpur Road) वाहतूक शाखेच्या (Traffic Police) युनिट दोनच्या कार्यालयात वाहने जमा करण्यात येणार आहे.

मागील सहा महिन्यांपासून याची प्रक्रिया सुरू होती. अखेर यास आज मुहुर्त लागला आहे. शहरात दुचाकीस्वारांची संख्या मोठी असून, दुचाकीस्वारांनाच टोईंगचा मोठा आर्थिक भुर्दंड (Financial ruin) बसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या