Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली

इगतपुरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली

घोटी । Ghoti

नयनरम्य निसर्ग, आल्हाददायक वातावरण व पर्यटनाचा अविष्कार असलेल्या इगतपुरी तालुक्यात पर्यटक, भाविकांचा ओघ वाढला आहे. तीन दिवस शासकीय सुट्या, दत्त जयंती सोहळा, पुढील आठवड्यात सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मुंबई, नाशिककडून येथे पर्यटक येथे येत आहे. भाविकांचा ओघ वाढला आहे.

- Advertisement -

तीन दिवसांपासून मुंबई-आग्रा महामार्गावर, घोटी-सिन्नर महामार्ग तसेच घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिसत आहे. आगामी आठवडाभर ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे सात आठ महिने भाविक, पर्यटन यांना बाहेर पडता येत नसल्याने आता या मुंबई, नाशिक कडील पर्यटक, भाविकांना इगतपुरी तालुक्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. पर्यटकांची तसेच भाविकांच्या वाहनांमुळे माहमार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. वाहतूक कोंडीचा फटका पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसला. यावरून पर्यटकांच्या गर्दीचा अंदाज येतो

भावली, वैतरणा, सिन्नर मार्गावर ठिकठिकाणी पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेत आहे, वनभोजन करताना दिसतात. इगतपुरी तालुक्यातील सर्वच मार्गावरील हॉटेल्सवर गर्दी दिसत आहे. इगतपुरी तालुक्यात गडकिल्ले आहेत.

मनमोहित भावली परिसर, धरणांचा निसर्ग, भुतलावरील स्वर्ग म्हणजे घोटी वैतरणा मार्ग, त्र्यंबकेश्वर, शिर्डीकडे जाणारे भाविक, कावनई, पंपासरोवर, टाकेदचे तीर्थक्षेत्र पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या