Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोवीड सेंटरमध्ये हुज्जत घालणारा 'तोतया' पोलीस ताब्यात

कोवीड सेंटरमध्ये हुज्जत घालणारा ‘तोतया’ पोलीस ताब्यात

नाशिक। प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करत समाजकल्याण कार्यालय येथील कोविड सेंटर येथे गोंधळ घालणार्‍या तोतयास मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे…

- Advertisement -

सचिन दत्तात्रय खरात (रा. काठेगल्ली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी द्वारका जवळील समाजकल्याण कार्यालय येथे कार्यरत असलेल्या कोवीड केअर सेंटर येथे खरात हा नातेवाईकास डबा देण्यासाठी म्हणुन आला होता.

या ठिकाणी करोना चाचणीसाठी तसेच उपचारांसाठी आलेल्या रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असतानाही खरात खाने कोवीड सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले असता त्याने आपण मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगीतले.

तसेच बनावट ओळखपत्र दाखवून सुरक्षा रक्षकांशी वाद घातले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीसांना माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांनी तेथे धाव घेऊन सबंधीताची चौकशी केली असता त्याचा बनाव उघडकीस आला.

त्यास अटक करण्यात आली असून त्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच कोवीड केअर सेंटर येथे रूग्णसास भेटणे अगर बाहेरील कोणतीही वस्तु देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या