Monday, April 29, 2024
Homeनगररस्त्यात सापडलेले कासव दिले वन विभागाच्या ताब्यात

रस्त्यात सापडलेले कासव दिले वन विभागाच्या ताब्यात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जतचे नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे हे सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कर्जतहून राशीनच्या श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी जात होते. बेनवडी फाट्यानजीक रस्त्यावर त्यांना कासव असल्यासारखे वाटले. दर्शन करून परत येताना, तेच कासव रस्त्यावर थांबून होते.

- Advertisement -

रहदारीच्या वाहनांमुळे त्याचा जीव जाऊ नये म्हणून त्यांनी ते कासव उचलून घरी आणले. याबाबत त्यांनी रेहेकुरी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सागर केदार यांना कळविले. त्यांनी तातडीने रेंजर निलेश जाधव यांचे पथक पाठवले. रात्री अकराच्या सुमारास ते कासव सुरक्षितपणे वन्यजीव संरक्षण पथकाच्या ताब्यात देण्यात आले. देवीच्या दर्शनाबरोबरच कासवाचेही दर्शन होऊन त्याचा जीव वाचवता आला, याचे समाधान वाघचौरे कुटुंबियांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या