Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजळगावात वादळी पाऊस; वीजपुरवठा खंडित

जळगावात वादळी पाऊस; वीजपुरवठा खंडित

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा (Ukada in the atmosphere) असह्य होत असताना रविवारी दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह (stormy winds) मान्सूनच्या (monsoon) पहिल्या पावसाला सुरुवात (first rains begin) झाली. जळगाव शहरातील सर्वच भागात अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस झाल्याने काही वेळातच सर्वत्र पाणी होऊन रस्त्यावरून पाणी वाहून निघाले आहे. त्यात काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या (branches of the tree are broken) होत्या. तसेच नवीपेठ भागात गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी वाहत होते.

- Advertisement -

7 जूनपासून मान्सून पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाच दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने यंदा पाऊस लांबणार की काय? अशी चिंता निर्माण झाली होती. रविवारी सकाळपासून उकाडा आणि घामाच्या धारांनी नागरिक बेजार झाले होते.

दुपारी 3.20वाजेच्या सुमारास शहरात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाजारपेठेत व्यावसायिकांसह चाकरमान्यांची त्रेधातिरपट उडाली. या एक तासाच्या पावसाने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. वारा व पावसाची चिन्हे दिसत असताना शहरातील वीज पुरवठा खंडित झाला.

पाऊस उघडल्यानंतरही शहरातील वीजपुरवठा चार ते पाच तास खंडित झाला होता. शहरात रविवारी दुपारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर वार्‍यासह विजांचा कडकडाट होत असताना वीजपुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. रात्री 7.30 वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटसह इतर भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला होता.

वातावरणातील गारव्यामुळे दिलासा

शहरात रविवारी दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. वार्‍यासह विजेच्या कडकडाटासह सुरुवातीचे अर्धा ते एकतासापेक्षा अधिक वेळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतरही मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी शहरात कोसळत होत्या. एक तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस शहरात कोसळला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या