Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपिंपळगावला टोमॅटो दराची उच्चांकी झेप

पिंपळगावला टोमॅटो दराची उच्चांकी झेप

पिंपळगाव बसवंत। Pimpalgaon Basvant

करोनाच्या धास्तीने लागवडीत झालेली घट, त्यामुळे घटलेली आवक व त्या तुलनेत वाढलेली मागणी यामुळे टोमॅटोच्या दराने उंच झेप घेतली आहे. पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी 20 किलोच्या प्रतिक्रेटला 851 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

टोमॅटोच्या दराची वाटचाल एक हजार प्रतिक्रेटच्या दिशेने सुरू आहे. एकाच दिवसात 40 लाख रुपयांची उलाढाल पाहता टोमॅटोने लाल क्रांती केली आहे. बांगलादेशमध्ये दररोज 200 टन टोमॅटो निर्यात होत असल्याने टोमॅटोच्या दरालाही चमक आली आहे.

पिंपळगाव बसवंत व लासलगाव बाजार समितीत टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आवकेत निम्म्याने घट झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पिंपळगाव बाजार समितीत दररोज टोमॅटोचे किमान एक लाख क्रेट विक्रीसाठी आले आहेत.

पिंपळगाव बाजार समितीत अवघे 50 हजार क्रेट विक्रीसाठी आले. सरासरी 641 रु. तर कमाल 851 रुपये प्रतिक्रेट असा आकर्षक दर मिळाला. परराज्यातील टोमॅटोच्या हंगामावर अतिपावसाने पाणी फिरविले.

गुवाहाटी, उत्तर प्रदेश, बिहार तर महाराष्ट्रातील नारायणगाव येथील हंगाम वाया गेले. बेंगळूर, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथे टोमॅटो अत्यल्प प्रमाणात बाजारात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या