Saturday, April 27, 2024
Homeनाशिकवनतस्करी राेखण्यासाठी 'टाेल फ्री नंबर'

वनतस्करी राेखण्यासाठी ‘टाेल फ्री नंबर’

नाशिक | Nashik

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटक हा महत्वपूर्ण आहे. या सर्व घटकांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी नाशिक पश्चिम वन वनविभागाने वनविभागाचा टोल फ्रि नंबर १९२६ हा सर्वसामान्य नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

- Advertisement -

घडणारे वनगुन्हे, वन्यजीवांची तस्करी, शिकार, वन्यजीवांचे अपघात, तसेच वनात लागणाऱ्या आगी किंवा अवैध वृक्षतोड व अतिक्रमण या संदर्भात काही माहिती असल्यास तत्काळ नाशिककरांनी या नंबरवर कळवावी.

नंबरची सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे. नाशिक शहराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. येथे मानवावरील हल्ल्याच्या घटना सुध्दा घडत असतात. अशा वेळेस नाशिककरांनी वनविभागाला दिलेली माहिती महत्वपूर्ण असेल.

त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकेल. तसेच इतर माहितीमुळे वनात घडनाऱ्या अवैध घटनांना आळा बसण्यास मदत हाेणार आहे, असे पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या