Thursday, April 25, 2024
Homeनगरटोल नाक्यावर फास्ट टॅग वापरणार्‍यांची संख्या 65 टक्क्यांपर्यंत वाढली

टोल नाक्यावर फास्ट टॅग वापरणार्‍यांची संख्या 65 टक्क्यांपर्यंत वाढली

सुपा |वार्ताहर| Supa

अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फास्ट टॅग वापरणारांची संख्या वाढली असून गेल्या दोन दिवसांत फास्ट टॅग वापरण्याचे प्रमाण डबल झाले आहे.

- Advertisement -

देशभर रस्ते महामार्गाचा विकास करण्यासाठी खाजगीकरणातून रस्ते बांधणी केली जाते व त्या बदल्यात विकासाला काही ठराविक काळ त्या महामार्गावर पथकर (टोल वसुली) वसुलीची परवानगी दिली जाते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी पथकर वसुलीसाठी वाहन चालकांना वाहनावर फास्ट टॅग वापरण्याचे आवाहन केले होते.

जेणेकरून ऑनलाईन व्यवहार होतील. प्रवाशाचा वेळ वाचेल व टोलनाक्यावर रोज होणार्‍या वादावादीही टळतील. हा त्यामागचा शासनाचा उद्देश आहे. शासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी शेवटची मुदत देत सर्वच वाहन धारकाना फास्ट टॅग वापरणे सक्तीचे केल्याने पूर्वी अल्प प्रमाणात असलेले फास्ट टॅग वापराचे प्रमाण वाढून आता 65 टक्के ते 70 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

अहमदनगर-शिरूर हा 60 किलो मीटरचा महामार्ग सन 2007 ते 2010 या कालावधीत खाजगी कंपनी चेतक एन्टरप्रायजेसने बांधला व सन 2010 पासून त्यावर टोल आकारण्यात येऊ लागला. या कंपनीला सन 2027 पर्यंत टोल वसुलीची परवानगी देण्यात आली आहे. यात छोट्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. तर इतर वाहनांकडून शासनाच्या आदेशानुसार टोल वसुली केली जाते. सुरुवातीला 100 टक्के रोख स्वरुपात असलेली टोल वसुली काळानुसार कॅशलेस होत आहे.

जानेवारी 2021 पर्यंत टोल फास्ट टॅग व रोख असे निम्मे निम्मे प्रमाण होते; परंतु 16 फेब्रुवारी 2021 पासून फास्ट टॅग वापरकर्त्याचे प्रमाण डबल झाले आहे. फास्ट टॅगमुळे वाहन चालकांचा वेळही वाचतो. व्यवहारही कॅशलेस, सुरक्षीत व पारदर्शक होत असे टोल वसुली व्यवस्थापकाच्यावतीने सांगितले जात आहे. दरम्यान या टोलनाक्यावर पेटीएम व आयसीआयसीआय बँक या दोन संस्थांनी वाहनधारकांना फास्ट टॅग बनवून देण्यासाठी स्टॉल लावले आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या