Friday, April 26, 2024
Homeक्रीडाTokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकमध्ये करोनाचा शिरकाव

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकमध्ये करोनाचा शिरकाव

दिल्ली l Delhi

टोकियो ऑलिम्पिकला (Tokyo Olympic) अवघे काही दिवस उरले असताना दुसरीकडे ऑलिम्पिकवरील करोनाचे सावत गडद होत चालले आहे. येत्या २३ जुलै ऑलिम्पिकला सुरु होणार असून ते ८ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. (okyo Olympics registers first Covid-19 case)

- Advertisement -

दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आठवडा शिल्लक असताना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (Olympic Village) एकाला करोनाची लागण झाली आहे. आयोजकांनी याबद्दल माहिती दिली आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमधील एक जण करोना पॉझिटिव्ह (test positive for covid 19) आढळल्याची माहिती टोक्यो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशीरो मुटो यांनी दिली. खेळांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक जण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गोपनीयतेचा हवाला देत त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीबद्दल माहिती दिली नाही.

ऑलिम्पिकसाठी क्रीडापटू तसेच पदाधिकारी टोकियोत (Tokyo) येण्यास सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये आलेल्या ८ हजार जणांची आत्तापर्यंत चाचणी करण्यात आली. त्यातील काहीजण तिथे बाधित आढळले आहेत. या बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

ऑलिंपिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवडा टोकियोत १ हजार ३०८ बाधित आढळले. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा संयोजनाचा विरोध वाढत आहे. स्पर्धा विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. त्यावर साडेचार लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होणार हे सांगितले जात आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे, अशी विचारणा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या