Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाTokyo Olympic 2020 : मेरीकोम, पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

Tokyo Olympic 2020 : मेरीकोम, पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

दिल्ली l Delhi

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला.

- Advertisement -

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) पहिली मॅच जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मेरी कोमनं डोमिनिक रिपब्लिकच्या मिगुएलिना हर्नांडेज गार्सिया (Hernandez Garcia) हिचा ४-१ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मेरी कोमनं पहिल्या फेरीमध्येच आघाडी घेतली. त्यानंतर पुढील दोन राऊंडमध्ये तिने ती आघाडी कायम राखत गार्सियाचा पराभव केला.

तसेच रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली. रिओ-ब्राझील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी व्ही सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. पी व्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या