Tuesday, April 23, 2024
Homeनगरवीज बिल कमी करण्याचा संगमनेरात नवीन फंडा

वीज बिल कमी करण्याचा संगमनेरात नवीन फंडा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

विजेवर चालणार्‍या वेगवेगळ्या वस्तू (Different objects running on electricity) घरात वापरले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज बिल (Electricity bill) येत आहे. हे बिल कमी यावे यासाठी संगमनेरात (Sangamner) काही वीज ग्राहकांनी (Electricity Consumers) नवीन शक्कल लढविली आहे. मालेगाव (Malegav) येथील एक तज्ञ व्यक्ती यासाठी पंधरा हजार रुपयांची आकारणी करीत असून तो विजेच्या मीटर (Electricity Meter) मधील अंतर्गत सिस्टीमच बदलून देत आहे. यामुळे कितीही वीज वापरली तरी बिल अतिशय कमी रकमेचे येत असल्याने शहरांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

संगमनेर (Sangamner) येथील वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) कार्यालयामध्ये गलथानपणाचा कारभार सुरू आहे. या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपले कर्तव्य विसरून मूळ कामाकडे दुर्लक्ष (Ignore) केले आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक वीज ग्राहकांचे चांगलेच फावले आहे. वेगवेगळे प्रकार अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे (Ignore) शहरात सुरू असल्याचे चित्र आहे.

विजेचा वाढता वापर व त्यामुळे येणारे बिल यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहे. याचा गैरफायदा मालेगाव येथील एका व्यक्तीने उचलला आहे. विजेच्या मीटरमध्ये फेरफार करण्यात तरबेज असलेल्या या व्यक्तीने अनेक ग्राहकांच्या मीटरमध्ये बदल करून दिले आहेत. मीटर मधील अंतर्गत सिस्टीममध्ये तो बदल घडवून आणतो. यासाठी पंधरा ते वीस हजार रुपयांची आकारणी त्यांच्याकडून केली जात आहे. मीटर मधील अंतर्गत सिस्टीममध्ये बदल केल्यामुळे विजेचा कितीही वापर केला तरी हे मीटर पळत नाही. यामुळे हजारो रुपयांचे बिल अवघ्या काही शेकड्यावर येऊन ठेपले आहे. काही ग्राहकांच्या घरात पंखा, कुलर, ए.सी, टीव्ही, फ्रीज याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही त्यांना अवघे दोनशे ते अडीचशे रुपयांचे बिल येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

मीटरच्या अंतर्गत सिस्टीम बदला प्रमाणेच इतरही काही प्रकार वापरले जात आहे. जुने मीटर वापरल्याने वीज बिल कमी येत असते यामुळे अनेक ग्राहक नवीन मीटर ऐवजी जुने मीटर घेण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी ते संबंधित अधिकार्‍यांना खुश करतात. शहरामध्ये असे गैरप्रकार घडत असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये काही अधिकार्‍यांची मनमानी वाढली आहे. कार्यालयात येणार्‍या ग्राहकाशी ते उद्धटपणाची वर्तणूक करतात. ठराविक कर्मचार्‍यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर चुकीची कामे सुरू आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गैरप्रकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सूज्ञ नागरिकांचे मत आहे.

फेर जोडणीसाठी पैशांची आकारणी

थकित वीज बिलामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. थकित वीज बिल भरल्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फेर जोडणीकरिता ठराविक नमुन्यातील अर्ज व ठराविक शुल्क भरावे लागते. मात्र काही वायरमन या फेर जोडणीसाठी रोख रक्कम स्वीकारत असल्याची चर्चा आहे. त्यांना अशी रक्कम स्विकारण्याचा अधिकार नसतानाही कोणाच्या आदेशावरून ही रक्कम स्वीकारतात असा सवाल विचारला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या