Wednesday, April 24, 2024
Homeनगरतरूणाला लुटून पळणार्‍या वाहनाने दिली चार वाहनांना धडक

तरूणाला लुटून पळणार्‍या वाहनाने दिली चार वाहनांना धडक

करंजी |वार्ताहर| Karanji

सावरगाव रस्त्यावर (Savargav Road) शाळकरी मुलाचे गळ्यांतील सोने ओरबाडून (chain snatching) त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण (Beating) करून चारचाकी वाहनातून घाटशिरस मढीमार्गे तिसगावकडे (Tisgav) आलेल्या अज्ञात वाहनाने तिसगावमधील बसस्थानक (Tisgav Bus Stand) परिसरातील एका पादचार्‍यांसह दोन मोटर सायकलस्वार, एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोनजण ठार तर तीन जण जखमी (Injured) झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबतची सविस्तर माहिती अशी, मायंबा सावरगाव रस्त्यावर (Mayamba Savargav Road) शेतात चाललेल्या चैतन्य दिलीप भगत या सोळा वर्षीय शाळकरी मुलाच्या गळ्यांतील सोने ओरबाडुन त्याच्या हातातील मोबाईल (Mobile) हिसकावून घेत, त्याला मारहाण (Beating) करून पळ काढलेले तीन ज्ञात तरुण चारचाकी वाहनातून पसार झाले. या घटनेची माहिती सावरगाव-मढी (Savargav Madhi) येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी या वाहनाचा शोध सुरू केला. त्यानंतर या वाहनातील तरूण चार चाकी गाडीसह घाटशिरस मार्गे तिसगावकडे (Tisgav) आले. तिसगाव मधील बस स्थानक (Bus Stand) चौकात या वाहनाने रस्त्याने पायी चाललेले रमेश साहेबराव नरवडे राहणार तिसगाव यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

यानंतर समोरून मोटर सायकल वरून येणारे गंगाधर सूर्यभान बुधवंत बाळू बंन्सी केदार यांना जोराची धडक दिली. यामध्ये बुधवंत राहणार शिरापूर हे गंभीर जखमी झाल्याने मयत झाल्याची माहीती समजली. त्यानंतर प्रा. प्रकाश पंढरीनाथ लवांडे (रा. मांडवे) यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यामध्ये लवांडे देखील जखमी (Injured) झाले. त्यानंतर याच अपघातग्रस्त वाहनाने युसुफ पठाण यांच्या दुकानाला धडक दिल्याने तिथेच बंद पडल्याने या वाहनातील तिघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती समजताच तिसगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

सुमारे दीड तास याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्तांना तात्काळ नगरला हलविण्यात आले. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जमावाला शांत करत असतानाच एका घराच्या छतावर या अपघातातील एक आरोपी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी (Police) मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे पाथर्डी (Pathardi), शेवगाव -पैठण (Shevgav-Paithan) व नगर या तीनही मार्गावर एक किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती.

दीड तासंनातर वाहतुक सुरळीत झाली. ताब्यात घेतलेल्या तरुणामुळे इतर दोघे जण सापडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. तिसगाव येथे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे (pits) मोठे अपघात (Accident) होत असून खड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप देखील यावेळी तिसगाव येथील तरुणांकडून व्यक्त करण्यात आला. या अपघातानंतर मोठा जमाव येथे एकत्रित आला होता. परंतु पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण (PI Suhas Chavhan), उपनिरीक्षक प्रवीण पाटील (Sub-Inspector Praveen Patil), भगवान सानप यांनी संपूर्ण परिस्थिती शांतपने हाताळत जमावाला शांत केले.

अपघातग्रस्तांना तिसगावचे उपसरपंच इलियास शेख सर, युवा नेते भाऊसाहेब लवांडे, पंचायत समिती सदस्य सुनिल परदेशी,रफीक शेख सर, ताहेर पठाण, अरिफ तांबोळी, निसार पठाण, सकलेन पठाण, समीर डफेदार, ग्रामपंचायत सदस्य पापाभाई तांबोळी यांनी मदत केली. बाबत उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या