Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारटायर फुटल्याने कारला अपघात

टायर फुटल्याने कारला अपघात

शहादा Sahada । ता.प्र.-

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत (Welcome students) करून धडगाव येथून शहाद्याकडे परत येणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior college) शिक्षकांच्या (teachers) कारचे टायर फुटल्याने (car’s tires burst) अपघात (Accident) होवून शांतीलाल बुधा सूर्यवंशी हे शिक्षक जागीच ठार (Killed on the spot) तर चार शिक्षक जखमी झाल्याची घटना शहरापासून चार किलोमीटर अंतरावर दरा फाट्याच्या पुढे पेट्रोल पंपांनजीक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मयत शिक्षक येथील ठकार कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते.

- Advertisement -

काल दि.15 रोजी शाळेचा पहिलाच दिवस होता. धडगाव येथील ठकार कनिष्ठ महाविद्यालयात (Thakar in junior college) विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी या महाविद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक शांतीलाल बुधा सूर्यवंशी, शितल राणे, शरद चंद्रसिंग पाटील, नरेंद्र दादूसिंग गिरासे व रुपेश मधुकर पाटील (सर्व रा.शहादा) हे विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशाचे स्वागत (Welcome to school admission) करून कार (क्र.एम.एच.-39 ए.बी.-0918) शहादा येथे घरी परत येत असताना शहादा महाविद्यालयाच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपानजिक अचानक कारचा टायर फुटल्याने (car’s tire burst) चालकाचे नियंत्रण सुटले.

त्याचवेळी समोरून येणार्‍या वाहनाची या कारशी जोरदार धडक झाल्याने कार तीन ते चार वेळा पलटी झाली. कारमध्ये बसलेले शांतीलाल सूर्यवंशी यांना या अपघातात जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शहादा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी एका जखमीला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अन्य वाहनचालकांनी देखील मदतकार्य केले. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी मदतकार्य राबविले.

अपघातात ठार झालेले शांतीलाल सूर्यवंशी यांच्यावर सायंकाळी उशिरा शहादा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दरा फाटा ते लोणखेडा दरम्यान वारंवार अपघात होत आहेत. तीन दिवसांपूर्वी देखील शहादा महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारानजीक बोलेरो वाहनाला अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला होता. तीन वर्षापूर्वी याच ठिकाणी मजुरांना वाचविताना कार उलटून झालेल्या अपघातात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख जागीच ठार झाले होते. त्यामुळे भरधाव येणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या