तिरट जुगार खेळणारे वडारवाडीत 11 जण पकडले

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराच्या वरच्या मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार खेळत असलेल्या 11 जणांना पोलिसांनी छापा टाकून पकडले. रविवारी रात्री भिंगार शहरातील वडारवाडी भागात भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार भानुदास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. आदिनाथ दगडू धिरडे (वय 45), राजेंद्र शिवाजी दिवटे (वय 62), शिवाजी बादशाह निस्ताने (वय 52), प्रकाश गोविंद वराडे (वय 63), हरीश्चंद्र मारूती नागापुरे (वय 65), ताराचंद्र मारूती नागापुरे (वय 64), अशोक केशव माने (वय 56), मनोज यशवंत धंडारे (वय 42), भास्कर आसाराम जाधव (वय 42), सय्यद मोहंमद युसूफ (वय 54), सोमनाथ दिलीप आहेर (वय 36 सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

पकडलेल्या जुगार्‍यांकडून 14 हजार 100 रूपये रोख रक्कम, 41 हजाराचे मोबाईल, एक लाख 95 हजारांच्या दुचाकी असा दोन लाख 50 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वडारवाडी येथील सिटीझन कॉलनीमध्ये राजेंद्र शिवाजी दिवटे याच्या घरामध्ये तिरट जुगार खेळला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक देशमुख यांनी उपनिरीक्षक किरण सोळुंके यांच्यासह पथकातील अंमलदारांना सोबत घेत राजेंद्र दिवटे याच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी 11 जण जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत कारवाई केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *