Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजीवनावश्यक आस्थापनांवर सुद्धा वेळेचे बंधन

जीवनावश्यक आस्थापनांवर सुद्धा वेळेचे बंधन

नाशिक । प्रतिनिधी

‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

किराणा व भूसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पुर्णत : बंद राहतील. ज्या किराणा दुकानांमधुन दुध अथवा भाजीपाला विकला जातो अशी दुकाने बंद ठेवुन त्या दुकानांचे समोरच्या जागेत टेबलद्वारे दुध व भाजीपाला विकण्यास संबंधित दुकानदारास परवानगी राहणार आहे. तसेच पुर्णपणे केवळ दुध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील.

अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था सुरु ठेवण्यात आली असल्यामुळे या क्षेत्राचे निगडीत टायर विक्री , रिपेअर वर्कशॉप , सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील, त्यासाठी त्यांना संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक असणार आहे .

मात्र वाशिंग सेंटर आणि कार डेकोर इतर संबंधित आस्थापना बंद असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या