Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंत शहरात आता लाकडांचा तुटवडा

पिंपळगाव बसवंत शहरात आता लाकडांचा तुटवडा

पिंपळगाव | Pimpalgaon

पिंपळगाव बसवंत व परीसरात करोनाची वाढत असून मृत्यू चे प्रमाणही अचानक वाढते आहे.

- Advertisement -

त्यामुळे शहर तसेच परीसरात आता करोनाची भिती वाढतच आहे. मर्यादेपेक्षा पिंपळगाव बसवंत अमरधाममध्ये आता अंत्यविधी साठी नाशिकसारखी परिस्थिती झाली असुन केवळ दोन अमरधाम शहरात असल्याने मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील अशी व्यवस्था असुन आता सदरची जागाही कमी पडत आहे.

एकाच दिवसात सात अंत्यसंस्कार होत असल्याने जागा ही अपुरी पडत असुन करोनावर उपचार साठी रेमडिसिविर व कोव्हक्सीनची जशी कमतरता भासत आहे. तशीच कमतरता आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांची भासणार असुन शहरातील काही प्रमुख लाकूड विक्रेत्यांकडे केवळ मर्यादित साठा उपलब्ध असल्याने व या कामाला मजुरच मिळत नसल्यामुळे आता लाकडाचा तुटवडा भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

आज पर्यत निफाड तालुक्यातील करोनाची परीस्थिती लक्षात घेता करोना बाधीत रूग्ण संख्या ९३५४ असुन उपचार घेत असलेले २२७२ आहे तर आतापर्यंत २४३ जनांचा मृत्यू झाला असुन मागिल काही दिवसांपासून पुर्वी नाशिक येथे करोना बाधीत मृत्यू झाल्यास नासिक च्याच अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते.

परंतु नाशिकची परिस्थिती भयानक झाल्याने करोनाचे मृतदेह आता गावोगावी घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करण्यात येत असुन पिंपळगाव बसवंत परीसरातील मृतदेह हे पिंपळगाव अमरधाम येथे वाढल्याने आता या पुढे लाकडांची टंचाई ला सामोरे जावे लागणार अशी परीस्थिती होऊ लागली आहेत.

अनेक वर्षांपासून लाकूड तोडण्याचे काम करनारे मजुर आता येण्यास तयार नाही. बाहेर गावी जाण्यास घाबरत आहे व अचानक म्रुत्युचे प्रमाण वाढल्याने दोन तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा असुन मजुर अभावी लाकडे आणण शक्यच होऊ शकत नाही.

– योगेश दळवी, लाकूड विक्रेता पिंपळगाव बसवंत

- Advertisment -

ताज्या बातम्या